29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयमोलमजुरी करुन ‘महापौर‘ झालेल्या तरुणाची घेतली राहूल गांधीनी दखल

मोलमजुरी करुन ‘महापौर‘ झालेल्या तरुणाची घेतली राहूल गांधीनी दखल

टीम लय भारी

इंदोर: मध्यप्रदेशातील एक आदिवासी मुलगा मजूरी करुन आपले पोट भरत होता. त्याने अगदी उष्टी खरकटी उचलण्याचे देखील काम केले. आशा महापौराची काॅंगेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी घेतली आहे. त्याने आपला अभ्यास सुरु असतांना वडिलांबरोबर मजूरी देखील केली. डोक्यावरुन लाकडाच्या मोळया वाहून आणल्या. त्या मध्यप्रदेशातील छिंदवाडातील तरुणाचे नाव आहे विक्रम आहाके. काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी आणि प्रियंका गांधीनी त्याची दखल घेतली आहे.

विक्रम आहाके यांचे वय 31 वर्षे आहे. त्याची आई अंगणवाडी सेविका तर वडील शेतकरी आहेत. त्याला समाजासाठी काहीतरी करायचे होते, म्हणून त्याने नोकरीवर पाणी सोडले. त्याने काॅंग्रसचे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना भेटून सांगितले की, मला जनतेची सेवा करायची आहे. राजकारणात यायचे आहे. तेथूनच त्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. 18 वर्षांनंतर त्याने काॅंग्रेससाठी महापौरपद खेचून आणले. त्याने काॅंग्रेसची प्रतीमा उंचावली आहे. त्यामुळेच राहूल गांधीनी त्याची दखल घेतली आहे.

हे सुध्दा वाचा:

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी